देशाचे लुटारु

Posted on September 8 2014 by pits

दूर दृष्टीचा अभाव आमुच्या नसानसा मध्ये भरला

अन काळ्या बाजाराने अवघा देशची पोखरीला

 

ज्या नेत्यानी धडे ध्यायचे अवघ्या देशाला

तेच पुढारी पडघ्याआडुनी लुटीती देशाला

 

दारू, सिगरेट, अमली पदार्थ मिळती रस्त्याला

सेवन त्याचे करूनी अवघा तरूण वाया गेला

 

व्यापारी नी उद्योगपती हे लुटीती देशाला

ताकद नाही कुणापाशीही विरोध करण्याला

 

विरोधी पक्षही विसरूनी गेले आपुल्या कर्तव्याला

जनता बिचारी हात लावते आपुल्या कपाळाला

 

राजकारणी सगळे शिकले कमिशन खाण्याला

तुम्हीही शिकले मतदानाचे पैसे घ्यावयाला

 

स्वाभिमान जर तुम्ही ठेवला टांगून खुंटीला

देश आपुला कोण वाचविल सांगा आम्हाला?

Powered By Indic IME