दिल्ली गँगरेपची घटना लवकरच रुपेरी पडद्यावर

Posted on September 23 2013 by yogesh

जम्मू-काश्मीर : दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे संपूर्ण देश हादरला होता. बलत्काराची ही घटना आता लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

दिल्लीच्या या घटनेवर जम्मूमधील एका दिग्दर्शकाने ‘दामिनी…द विक्टिम’ नावाचा चित्रपट बनवला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार जम्मू आणि काश्मीरमधलेच आहे. तसंच संपूर्ण सिनेमा जम्मू आणि काश्मीरमध्येच चित्रीत झाला आहे. बॉलिवूड अभिनेते रघुवीर यादव यांनीही या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आहे.

दामिनी नावाच्या मुलीची ही कहाणी आहे. या मुलीसोबत गँगरेप होतो, जसा 16 डिसेंबर रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये झाला होता. गँगरेपनंतर मुलीची मानसिक स्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

हा सिनेमा पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Powered By Indic IME